बांबवडे येथील आनंद हॉटेल चे मालक बाबुराव प्रभावळे यांचे दुःखद निधन
बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील आनंद हॉटेल चे मालक बाबुराव तातोबा प्रभावळे वय ७८ वर्षे यांचे अल्पश : आजाराने दि. १० जानेवारी २०१८ रोजी दुःखद निधन झाले. या निधन संदर्भाने दि.११ जानेवारी रोजी सर्व व्यापाऱ्यांनी सकाळपासून दुकाने बंद ठेवली होती.
स्व. बाबुराव प्रभावळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन पुतणे सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.