आध्यात्मिक संत भय्यूजी महाराज यांनी स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या
मुंबई : मध्यप्रदेश मधील आध्यात्मिक संत भय्यूजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून इंदौर येथे आत्महत्या केली. त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले. परंतु उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
भय्यूजी महाराज यांचे मूळ नाव उदयसिंग देशमुख असे होते. ते अनेक ट्रस्ट चे संस्थापक होते. परंतु मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःला कर्जबाजारी घोषित केले होते. कर्जातून आलेल्या नैराश्येतून आणि कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सुरु आहे.
भय्यूजी महाराज हे हाय प्रोफाईल लोकांमध्ये नेहमीच चर्चेत असायचे. स्व.विलासराव देशमुख, पंतप्रधान नरेंद्र मोदी,यांच्यासारख्या लोकांबरोबर संबंध होते.