आसुर्ले परिसरात वळवाच्या पावसाची जोरदार हजेरी – शेतकरी वर्गातून समाधान
आसुर्ले : आसुर्ले तालुका पन्हाळा परिसरात वळीव पावसाने लावलेल्या हजेरीने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
आज दि.२३ मे रोजी सायंकाळी पाच वाजनेच्या सुमारास वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. उन्हाच्या तडाख्याने जनता हैराण झाली होती. तसेच उन्हामुळे पिकांना पाणी मिळत नव्हते. . यामुळे शेतकऱ्याला शेतीच्या मशागतीसाठी, व पेरणी साठी पावसाची गरज होती.परंतु वळवाच्या पावसाने तासभर जोरदार बरसात केली. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.