दि. २३ फेब्रुवारी ला बांबवडे त धडाडणार भिडे गुरुजींची तोफ
बांबवडे : धर्मवीर संभाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला आपले जीवन वाहून घेणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संभाजी भिडे गुरुजी येत्या २३ फेब्रुवारी रोजी बांबवडे त येणार आहेत .
भिडे गुरुजी म्हणजे वार्धक्यातही सुटलेलं तुफानी वादळ आहे. भिडे गुरुजींची मुलुख मैदानी तोफ बांबवडे त धडाडणार आहे. त्यांच्या प्रबोधनाने कोणी भारावून जाणार नाही तरच नवल. तेंव्हा या भिडे गुरुजींच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या ओघवत्या वाणीतून होणारे प्रबोधन ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी ,असे आवाहन बांबवडे संयुक्त शिवजयंती च्या संयोजकांनी केले आहे. हा कार्यक्रम बांबवडे येथील जनावरांच्या बाजारात होणार आहे.