अभिनेते भरत जाधव यांना पितृशोक
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते भरत जाधव यांचे वडील गणपत हरी जाधव (वय ८७ वर्षे )यांचे कोल्हापुरातील, साने गुरुजी वसाहत येथील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गणपत जाधव यांनी मुंबईत प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, किरण, हरिभाऊ, आणि अभिनेते भरत असे तीन मुलगे व एक मुलगी ,आनिसुना नातवंडे असा परिवार आहे.