श्री.क्षेत्र पैजारवाडी इथ श्री दत्त जयंती महोत्सव २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर
पैजारवाडी प्रतिनिधी :-
श्री.क्षेत्र पैजारवाडी (ता.पन्हाळा) येथे पं. पू. सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर संस्थानच्या वतीने सपन्न होत असलेला २०१७ चा श्री दत्त जयंती महोत्सव दि.२६ नोव्हे.पासून प्रारंभ होत असून, ४ डिसेंबर पर्यंत श्री दत्त नवरात्रा सह भक्तासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सलाबाद प्रमाणे पं. पु.सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र पैजारवाडी येथे रविवार दि.२६ नोव्हेेबर पासून सुरु होत असलेल्या दत्त जयंती महोत्सवा बरोबरच अखंड नामविणा गुरुचरित्र पारायण व नवरात्रास आरंभ होत आहे.
तसेच रविवार दि.३ डिसेंबर रोजी सायं.५.४५ वाजता श्री दत्त जन्मकाळ व पालखी सोहळा संपन्न होणार असून
सोमवार दि.४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायं.५ या वेळेत महाप्रसाद होईल.
या नवरात्र कालावधीत रोज पहाटे काकड आरती, श्री ना अभिषेक, त्रिकाल आरती, रात्रौ भजन, कीर्तन, प्रवचन,भावगीत गायन इ.धार्मिक कार्यक्रम होतील. या महोत्सवाचे औचित्य साधून, श्री चिले महाराज मूर्तीवर चांदीकलेचे छत्र अर्पण सोहळा पार पडणार आहे. हे छत्र भक्तांच्या देणगीतुन आणि श्रीच्या चरणी अर्पण केलेल्या चांदीमधून बनवण्यात आले आहे. तरी श्री क्षेत्र पैजारवाडी येथे होत असलेल्या श्री दत्त जयंती महोत्सवात भक्तांनी सहभागी होऊन श्री च्या दर्शनाचा व आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त यांनी केले आहे ..