देवाळे ज्युनियर कॉलेजचा बारावी निकाल ९९.५४%
पैजारवाडी प्रतिनिधी: देवाळे (ता पन्हाळा) येथील श्री.प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संस्थेचे देवाळे ज्युनियर कॉलेजचा बारावी बोर्ड निकाल ९९.५४% लागला आहे
या मध्ये आर्टस व कॉमर्सचा निकाल १००% तर सायन्सचा ९८.६१% निकाल लावून कॉलेजने यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे.
आर्टसची कु.वैष्णवी विजय जाधव हि ७८.१५% गुणासह पहिली आली. कॉमर्समध्ये कु.दीपाली बाबासो पाटील हिने ७९.५४% गुण मिळवून तर सायन्स मध्ये कु.पूनम शहाजी पोवार हिने ७२.६२ % गुण मिळवून प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले आहे
संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून संस्थेचे चेअरमन डी. बी पाटील,प्राचार्य जी डी भोसले,उपप्राचार्य ए. एम.पाटील,व पर्यवेक्षक एस.एस. पाटीलसर यांचे मार्गदर्शन लाभले.