इंजिनिअरींगच्या प्रथम वर्षासाठी ५ जून पासून ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया
कोल्हापूर (प्रतिनिधी) : अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रथम वर्षासाठी ५जुन पासून ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु होत आहे. उच्च व तंत्रशिक्षण संचालनालय च्या (डीटीई ) राज्य सीईटी सेल ने संकेतस्थळावर हि माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दरवर्षी बारावी परीक्षेच्या निकालानंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना सुरुवात होते. यावर्षी बारावी परीक्षेच्या निकालाच्या अगोदरच डीटीई ने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड लिंकिंग करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याच्या केंद्रांची यादी www.dtemaharashtra.gov.in/fe या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ८००/-रु., मागास वर्ग प्रवर्गासाठी ६००/- रु. तर एनआरआय ,ओसीआय,पीआयओ विद्यर्थ्याना ५०००/- रु.फी असणार आहे.विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आर्ज भरणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात ३४ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात चार एआरसी सेंटर असणार आहेत. प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या सुमारे १३ हजार प्रवेश जागा उपलब्ध आहेत.