‘आयटीआय’ च्या विद्यार्थ्यांनी जपलेय एक हळुवार नातं
पैजारवाडी प्रतिनिधी :- आपलं शैक्षणिक वर्ष संपलं कि, विद्यार्थी व गुरुवर्य यांतील नातं संपतं,पण गुरुवर्याविषयी असलेली कृतज्ञता जपलेय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी. आणि त्यांनी प्रशिक्षक गुरुवर्य श्री एन.जी.कुंभार सरांचा सन्मान केला. यातून त्यांनी गुरुवार्यांशी असलेल नात हळुवारपणे जपलेय.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोल्हापूर (आय.टी.आय,) येथे पेंटर जनरल १९९७ – ९९ बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी प्रशिक्षक गुरुवर्य श्री.एन.जी.कुंभार सर यांची भेट घेतली.
यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना, व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, माजी विद्यार्थी श्री.मुकेश लोहार,शिवाजी रावण,नेताजी पाटील,यशवंत कुंभार,संभाजी किरवे व कृष्णात हिरवे.