आंबवडे तील जवानाच्या मृत्युप्रकरणी पत्नी सविता ताब्यात
बांबवडे: आंबवडे तालुका पन्हाळा येथील जवान दीपक भुजिंगा पोवार यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी बेळगाव पोलिसांनी जवानाची पत्नी सविता हिला ताब्यात घेतले आहे. हि कारवाई बेळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदर्शन के.पट्टकुडे यांनी केली.
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि,दीपक पोवार हे बेळगाव येथे नऊ मराठा बटालियन मध्ये नाईक या पदावर रुजू होते.१९ मार्च ला त्यांच्या रहात्या घरी झोपेत असताना अंथरुणा ने पेट घेतल्याने ते गंभीर रीत्त्या भाजून जखमी झाले. दीपक पोवार यांनी आपल्या मृत्यू पूर्व जबाबात आपल्या पत्नीवर याबाबत संशय घेतला होता. म्हणूनच बेळगाव पोलिसांनी हि कारवाई केली. दरम्यान पोवार यांच्या कुटुंबियांनीही याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती. यासाठी आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. त्यानंतर शाहुवाडीचे पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.