जिल्ह्यात महामार्गानजीक ची ८८७ दारू दुकाने सील
कोल्हापूर : महामार्ग आणि शहरातील रस्ते मार्गांपासून ५०० मीटर अंतरातील ८८७ दारू दुकाने,महसूल, उत्पादन शुल्क, महापालिका, नगरपालिका अधिकाऱ्यांच्या सहा पथकांनी सील केली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य मार्गावरील ५०० मीटर अंतरावरील परमिट रूम ,वाईन शॉप,बीअर शॉपीचे परवाने नूतनीकरण करू नयेत,असे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार वरील कारवाई करण्यात आली आहे.