सामाजिक

गायीच्या दुधाला अनुदान, तसेच एफआरपी च्या रकमा शेतकऱ्यांना मिळाव्यात,अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू-खासदार राजू शेट्टी

पूणे : शेतकऱ्यांची थकलेली एफआरपी २० जुलै पर्यंत देण्यात यावी.असे न झाल्यास आर.आर.सी.कायद्यानुसार कारखान्यावर कारवाई व्हावी. तसेच कर्नाटक सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या गायीच्या दुधाला ५ रुपये अनुदान मिळून ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावे,१५ जुलै पर्यंत हि कारवाई न झाल्यास पुन्हा रस्त्यावर येवू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना खडसावले.
आज पूणे येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कैफियत मोर्चा काढण्यात आला. यावेळी अखंड महाराष्ट्रातून शेतकरी वर्ग येथे जमा झाला होता.
यावेळी श्री शेट्टी म्हणाले कि, दुधाच्या भुकटी ला अनुदान मिळत असल्याचे शासन सांगत आहे. पण याबाबत शेतकऱ्याला काहीच अद्यापि मिळालेले नाही. हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा व्हावे.याबाबत ठोस निर्णय १५ जुलै पर्यंत न झाल्यास संघटना पुन्हा रस्त्यावर उतरेल,असा इशारा हि शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
यावेळी संघटनेचे सागर शंभू शेटे, युवा आघाडीचे अवधूत जानकर, सुनील पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!