गावाच्या विकासात राजकारण नको- श्री. सत्यजित देशमुख
शिराळा प्रतिनिधी :
गावच्या विकासामध्ये राजकारणाची बाधा येवू देऊ नका. विकासासाठी एकजूट होवून गावाची प्रगती साधा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले. कापरी ता.शिराळा येथे आमदार शिवाजीराव देशमुखसाहेब यांच्या स्थानिक विकास निधीमधून ५ लाख रुपये खर्चून पूर्ण झालेल्या हनुमान मंदिरासमोरील सभामंडपास संरक्षण भिंत कामाच्या उद्घाटन समारंभ ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थित होते. पंचायत समिती सभापती मायावती कांबळे, माजी जि.प.सदस्य महादेव कदम उपस्थित होते.
यावेळी सत्यजित देशमुख पुढे म्हणाले कि , या गावच्या विकासासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. येथील लोकांनी ज्या ज्या वेळी विकासकामांची मागणी केली आहे. त्या प्रत्येक मागणीला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. गावाच्या विकासामध्ये राजकारण बाजूला ठेवा. भाजप सरकार सत्तेवर असले, तरी विकासकामाच्या बाबतीत आम्ही कधीही मागे नाही. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. परंतु लोकांना दिलेली आश्वासने हे सरकार पूर्ण करू शकलेले नाही. लोकांचा भ्रमनिरास झाला आहे, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
यावेळी मानसिंगराव नाईक म्हणाले कि , या मतदारसंघाचा मी आमदार असताना ५१७ कोटी रुपयांची विकासकामे आणली. विद्यमान आमदारांनी गेल्या ३-४ वर्षामध्ये मतदारसंघ विकासकामांच्या बाबतीत मागे नेला.. इंग्रूळ, कापरी पाणी योजनेमुळे या विभागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न बहुतांशी प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे, असे नाईक म्हणाले.
यावेळी सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष तुकाराम पाटील, सरपंच मोहन पाटील, उपसरपंच संदीप पाटील, इंदुताई पाटील, अर्जुन पाटील, शंकर पाटील, बाबासो पाटील, मांगलेचे उपसरपंच धनाजी नरुटे, जयवंत पाटील, अमोल पाटील, संभाजी नलवडे, विक्रम पाटील, सचिन पाटील, अरुण पाटील, बापुसो पाटील, पांडुरंग पाटील, विश्वास पाटील, सुभाष पाटील, सुरेश पाटील, आनंदा सावंत, बाळकृष्ण पाटील, निलेश पाटील, रामराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.