जाबूंर ग्रांमपचायत पोट निवडणूकीत शिवसेना , जनसुराज्य मध्ये काटा लढत.
सोंडोली / वार्ताहर . :
शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील ग्रांमपचायत सोंडोली व जाबूंर, येथे पोट निवडणूक लागली असून येथे २७ मे रोजी मतदान होणार आहे. सोंडोली येथे वार्ड नं. २ मध्ये पोट निवडणूक असून, येथे दोन जागेसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. तर जांबूर येथे वार्ड क्रमांक १ मध्ये एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. येथे स्थानिक आघाड्या असल्या, तरी शिवसेना विरुध्द जनसुराज्य अशी काटा लढत होणार आहे.
शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील सोंडोली व ग्रुप ग्रांमपचायत जाबूंर ,मालगांव येथे जून २०१५ रोजी पंचवार्षिक निवडणूक प्रक्रीया झाली होती .परंतु खर्चाचे विवरण वेळेत न दिल्याने थेट जिल्हा आधिकारी कार्यालयाकडून कार्यवाही करुन सोंडोली येथील वार्ड क्रमांक २ मध्ये दोन सद्स्यांची पदे रद्द करण्यात आली होती . तर जांबूर येथील वार्ड क्रमांक १ मधील एक सद्स्य पद रद्द करण्यात आले होते.
विशेष म्हणजे सोंडोली व जाबूंर येथील रद्द झालेले सद्स्य जनसुराज्य पक्षाचे आहेत.
सोंडोली ग्रांमपचायत पोट निवडणूकीत वार्ड क्रमांक दोन मध्ये दोन जागेसाठी जनसुराज्य, भाजप, कर्णसिंह गायकवाड गटाकडून कडून सौ. पुजा पुंडलीक चोपडे व सौ .वैशाली समीर पाटील तर विरोधी सत्ताधारी शिवसेना राष्ट्रवादी कडून सौ.शितल आशोक चोपडे व सौ.सुनिता दत्तात्रय पाटील निवडूक लढवत असून, या वार्ड मध्ये यापुर्वी जनसुराज्य पक्षाचे उमेदवार निवडुन आले होते. येथे शिवसेना , राष्ट्रवादी तर्फे सरपंच सौ.अश्विनी पाटील, उपसरपंच गोरक्ष पाटील , युवानेते भिमराव पाटील , संपत पाटील , तुकाराम पाटील नेतृत्व करत असून विरोधी जनसुराज्य , भाजपा , कर्णसिंह गायकवाड गटा तर्फे माजी सरपंच प्रकाश पाटील, युवानेते शिवाजी चोपडे, आण्णासो पाटील, दिलीप पाटील, नेतृत्व करत आहेत.
येथे ग्रांमपचायती नऊ पैकी सहा जागा शिवसेना राष्ट्रवादी वादी कडे असून ते सत्तेत आहेत.
ग्रांमपचायत जाबूंर येथे पोट निवडणुक वार्ड क्रमांक एक मध्ये एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत . येथे जनसुराज्य , भाजपा , कर्णसिंह गायकवाड गटातर्फे दिलीप जगन्नाथ निकम तर विरोधी शिवसेना तर्फे सौ पुष्पा बाजीराव डिगे निवडणूक लढवत आहेत.
शिवसेना तर्फे बाजीराव डिगे, बळवंत कोठारी, प्रभाकर जगताप,’ दगडू लोहार, हे नेतृत्व करत आहेत. तर विरोधी जनसुराज्य , काँग्रेस तर्फे दगडु कोठारी, केशव पाटील, रगंराव भोसले , शिवाजी पाटील, हे नेतृत्व करत आहेत.
ह्या पोटनिवडणूकित दोन्ही आघाडी मार्फत जोरदार प्रचार मोहिम राबवली जात आहे. या मध्ये हळदी कुंकु कार्यक्रम , घरा घरात मतदारांच्या भेटीवर जोर आहे. सध्या येथे भात पेरणीसाठी शेतकरी मशागतीला लागला असून, उमेदवार घरात, मतदार शिवारात असच चित्र पहावयास मिळत आहे.