पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या खतांचे दरेवाडी इथं वाटप
पोर्ले : दरेवाडी तालुका पन्हाळा येथील शेतकऱ्यांना युरिया खताचे वितरण भाजप चे संपर्कप्रमुख अजितसिंह काटकर व भाजप कार्यकर्त्यांच्या हस्ते व दरेवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.
श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिसनिमित्त हारतुरे अथवा बुके यांच्या स्वरुपात शुभेच्छा देण्याऐवजी खताच्या स्वरुपात शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देवून त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच चाहत्यांनी खतांच्या स्वरुपात आपल्या लाडक्या नेतृत्वास शुभेच्छा दिल्या होत्या. त्या जमा झालेल्या खतांपैकी काही खतांचे वाटप दरेवाडी इथं करण्यात आलं.
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा 10 जून ला झालेल्या वाढदिवसानिमित्त जमा झालेले खत पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तसेच दरेवाडी गावामध्ये दि. १/७/१७ रोजी कृषी दिनानिमित्त सायंकाळी 5.30 वाजता वितरण करण्यात आले.
या वेळी भाजपा नेते मा. अजितसिंह काटकर, भाजपा प्रदेशोपाध्यक्ष संदीप भारमल, भाजपा पन्हाळा तालुका अध्यक्ष सुरेश बेनाडे, पन्हाळा तालुक्याचे सभापती पृथ्वीराज सरनोबत, चैतन्य सरनोबत सरकार, पन्हाळा तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष शौकत आगा, दरेवाडीच्या सरपंच हमीदा आगा, साई केबल नेटवर्क चालक सागर शिर्के, बाबासो चव्हाण आदि उपस्थित होते. तसेच खत नेण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.