कृष्णात हिरवे यांचा पुढारी चे रिजनल मॅनेजर यांच्या हस्ते सत्कार
पैजारवाडी प्रतिनिधी :
पन्हाळा व शाहुवाडी तालुक्यातील ग्रामीण वार्ताहरांची संयुक्त बैठक गुरुवार दि.२३/११/२०१७ रोजी पन्हाळा नगरपालिका शेजारी असणाऱ्या रसना हॉटेल मध्ये संपन्न झाली.
या बैठकीत बोरपाडळे चे वार्ताहर श्री कृष्णात हिरवे यांचा दैनिक पुढारी चे रिजनल मॅनेजर शशिकांत पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जाहिरात व्यवस्थापक जावेद शेख, पन्हाळा तालुका प्रतिनिधी राजू मुजावर, शाहुवाडी तालुका प्रतिनिधी आनंदा केसरे ,किरण म्हसकर आदी मान्यवर उपस्थित होते.