विजेच्या झटक्याने लांडोर जखमी
कोडोली वार्ताहर:-
गावातील निवास व्यवस्था ग्रामस्थांना कमी पडत असल्याने, आणि जंगली प्राणी किंवा पक्षी यांना शेती किंवा वन कमी पडत असल्याने, या दोन्ही घटकांची एकमेकांच्या निवास व्यवस्थेत अतिक्रमण होत आहेत. असाच एक प्रकार कोडोली ता.पन्हाळा मध्ये घडला आहे. शेतातील घराजवळ विजेच्या तारेला धडकून एक लांडोरी जखमी झाली.,बहुदा तिला विजेचा झटका बसला असावा, अशा जखमी असलेल्या लांडोरीला कोडोली येथील संजय दिनकर पाटील, आणि सुभाष दगडू वडर यानी जीवन दान दिले आहे.
शनिवारी दुपारी कोडोलीचे संजय दिनकर पाटील यांच्या शेताजवळील घराजवळ उडान घेता असताना, एक लांडोरी विजेच्या तारेला धडकून जखमी होऊन पडली. हे संजय पाटील आणि सुभाष वडर यांनी पाहिलं, आणि त्यांनी तिला उचलून घराजवळ नेले. पाणी पाजले खायला धान्य दिले, पण भेदरलेली आणि मूर्च्छित झालेली लांडोरी काय पूर्ववत होईना. तिला औषध उपचाराची गरज होती, म्हणून त्यांनी तिला कोडोली पोलीस ठाण्यात नेले, आणि तिथून वन विभागाला संपर्क करून तिला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. वेळीच दखल घेऊन संजय आणी सुभाष यांनी लांडोरीला वाचवले नसते, तर परिसरातील कुत्र्यानी तिचे लचके तोडले असते. संजय आणि सुभाष यांनी जखमी लांडोरीला जीवनदान दिल्यामुळे, निसर्ग प्राणी आणि पक्षी प्रेमातून त्यांचे कौतुक होत आहे.