बांबवडे त ‘ महादेव फौंडेशन ‘ च्या वतीने २२ ते २५ डिसेंबर महा कृषी प्रदर्शन
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथ होणारे महा कृषी प्रदर्शन इथल्या पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांना वरदान ठरेल,असे मत जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी व्यक्त केले.
बांबवडे इथ महादेव पाटील फौंडेशन साळशी च्या वतीने २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत महा कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. हे प्रदर्शन बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणात भरवण्यात आले आहे.
या प्रदर्शनात आधुनिक शेतीसाठी लागणारी औजारे ,कडबा कुट्टी, आटा चक्की मशीन, सोलर ,आदींचे स्टॉल मांडण्यात आले आहेत.
यावेळी युवा नेते कर्णसिंह गायकवाड म्हणाले कि, शाहुवाडी तालुक्याला कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक शेतीचे तंत्र पाहण्यास मिळणार आहे.तेंव्हा जनतेने या महा कृषी प्रदर्षणाचा लाभ घ्यावा.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी शेतकरी बांधवांना तसेच तालुक्यातील जनतेला या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी युवानेते कर्णसिंह गायकवाड,के.एन.लाड (पापा), जी.प. सदस्य हंबीरराव पाटील (बापू ), विजय बोरगे पैलवान, माजी अर्थ शिक्षण सभापती महादेव ज्ञानदेव पाटील, अजितसिंह काटकर, शाहुवाडी पंचायत समिती चे माजी उपसभापती महादेव श्रीपती पाटील, उद्योगपती बाळासाहेब खुटाळे, बाळासाहेब चौगुले, रवींद्र फाटक, प्रकाश पाटील चेअरमन बांबवडे नागरी पतसंस्था,शरद बाऊचकर, बांबवडे चे सरपंच सागर कांबळे, साळशी चे सरपंच संदीप पाटील, पैलवान तानाजी मगदूम, जयसिंगराव घोडे-पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश नारकर, अभयसिंह चौगुले, विलास खुटाळे, अमित खुटाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.