मराठा आरक्षण प्रश्नी १४ ऑगस्ट ला अहवाल सादर करा- उच्चन्यायालयाचे आदेश
मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी येत्या १४ ऑगस्ट ला होणाऱ्या सुनावणी दरम्यान सर्व कागदोपत्री अहवाल सादर करावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जावा, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या मागास प्रवर्ग आयोगाकडं प्रलंबित आहे. मात्र, आयोगानं यावर अद्याप कसलीही ठोस कार्यवाही केलेली नाही. याकडं याचिकेद्वारे लक्ष वेधण्यात आलं होतं. न्यायमूर्ती रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी खंडपीठानं आयोगाला कामाचा वेग वाढवण्याचे आदेश दिले.