पंतप्रधान मोदी नक्षलींच्या निशाण्यावर ?
पूणे : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्त्या ज्यापद्धतीने करण्यात आली होती, त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट नक्षलवाद्यांनी रचला होता, असे सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वीच काहींना पोलिसांनी संशयावरून पुण्यातून अटक केली होती. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्याकडे सापडलेल्या पत्रावरून हा कट उघडकीस आल्याचे पवार यांनी न्यायालयासमोर सांगितले.
चार लाख राऊंड फायर करण्याची क्षमता असलेलं एम -४ हे शस्त्र खरेदी करण्याचा या नक्षलवाद्यांचा प्लान असल्याचा धक्कादायक उल्लेख या पत्रात आहे. यासाठी आठ कोटी रुपये देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती, असं पवार यांनी न्यायालयात स्पष्ट केलं.