देश विरोधी प्रवृत्ती ठेचून काढू : आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : ‘ज्यांना वंदे मातरम म्हणायचे नाही, त्यांनी खुशाल देश सोडावा ,या शब्दात निषेध करत ,देश विरोधी प्रवृत्ती ठेचून काढू ‘,असा इशारा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे.
समाजवादी पक्षाच्या आबू आझमींनी वंदे मातरम म्हणणार नाही, असे केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ माजला, तर त्याचेच पडसाद आज कोल्हापुरात उठले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ,कोल्हापूर इथं आबू आझमी यांच्या प्रतिमेचे दहन करत त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या, “आबू आझमी कोण रे,पायतान मारा दोन रे “, “आबू आझमी चे करायचे काय, खाली डोके वर पाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.