बांबवडे (ता.शिराळा) ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी व भाजप ची सत्ता
शिराळा प्रतिनिधी : बांबवडे (ता.शिराळा) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप आघाडीने विजय संपादन केला. सरपंच पदासाठी राष्ट्रवादीच्या कोमल पाटील यांनी कॉंग्रेसच्या सविता पवार यांचा ६१९ मतांनी पराभव केला. ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी व भाजपा यांची सत्ता आली. काँग्रेसला एक हि जागा न मिळाल्याने, या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले आहे.
सकाळी ११ वाजता मत मोजणीस सुरवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भानुदास साठे यांनी काम पहिले.
प्रभाग,उमेदवारांना पडलेली मते अशी.
सरपंचपदासाठी
कोमल पाटील(राष्ट्रवादी)(८८६) विजयी
सविता पवार(काँग्रेस)(२६७)
प्रभाग एक मधून
मंगल झेंडे (काँग्रेस)( ९७)
निवास ताटे(भाजपा)(२७६) विजयी
विकास मोरे (काँग्रेस)(९५)
दीपक मोरे (भाजपा)(२८५) विजयी
संगीत पवार(राष्ट्रवादी) (२७६) विजयी
विमल माने (काँग्रेस)(९७)
प्रभाग दोन मधून
तात्यासाहेब माने (काँग्रेस)(१५१)
भारत माने(राष्ट्रवादी)(२१५) विजयी
चंद्रकांत हिंगणे (अपक्ष) (६८)
मंगल झेंडे(काँग्रेस)(१२६)
जयश्री ताटे (भाजपा)(३००) विजयी
आशा जाधव (भाजपा)(३०५) विजयी
छाया जाधव (काँग्रेस)(१२२)
प्रभाग तीन
शोभा बारपटे(भाजपा)(२९२)विजयी
सुनीता मोरे(काँग्रेस)(५६)
बाबासो बनसोडे व आशा धुमाळ हे बिनविरोध निवडून आले आहेत.
नोटा -सरपंचपदासाठी १७ तर उमेदवारासाठी ४७ एकूण ६४ मते नोटा साठी झाली.
यावेळी तहसीलदार दीपक शिंदे,नायब तहसीलदार के.जी.नाईक, आर.बी.शिंदे, सुहास घोरपडे उपस्थित होते.
निकाल समजताच विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.