‘ नो मर्सी ग्रुप ‘ च्या पिशवी शाखेचे उद्घाटन
बांबवडे : पिशवी तालुका शाहुवाडी इथं ‘ नो मर्सी ग्रुप ‘ च्या शाखेचे उद्घाटन ग्रुप चे संस्थापक पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या युवक वर्ग ‘ ग्रुप ‘ च्या माध्यमातून एकत्र येवून सामाजिक कार्यात सहभागी होत आहे. हि समाजाच्या दृष्टीने प्रगतीची बाजू आहे. कारण युवा वर्ग हाच देशाचा भावी आधारस्तंभ होत असतो. त्यामुळे युवकांचे एकत्रीकरण होणे, हि काळाची गरज आहे. ती कोणत्याही ग्रुप च्या माध्यमातून होवू दे. पण एकत्र येण्याची प्रक्रिया निश्चितच समाजाच्या प्रगतीचे लक्षण आहे.
यावेळी ‘ नो मर्सी ग्रुप ‘ चे संस्थापक पुष्कराज क्षीरसागर म्हणाले कि, युवा वर्गाचे एकत्रीकरण हि काळाची गरज आहे. भविष्यात देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी युवा वर्ग च पुढे येणार आहे.
यावेळी हर्षवर्धन पाटील,रोहन घोरपडे, धनाजी जाधव, रोहित पाटील, स्वप्नील कदम, निलेश पाटील, आकाश पाटील, गणेश पाटील, रोहित निकम, सुरज बंडगर, अक्षय जाधव आदी युवा वर्ग उपस्थित होते.