“राणी पद्मावती” : आक्षेपार्ह प्रसंग योग्य कि,अयोग्य ?
पन्हाळा तालुक्यातील मसाई पठार इथं सुरु केलेलं “राणी पद्मावती” यांच्या जीवनावरील ऐतिहासिक चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब ने सेट पेटवला. हि घटना कोल्हापूर च्यादृष्टीने दुखद घटना आहे. यासाठी संबंधितांना अटक होणे गरजेचे आहे.
दुसरी गोष्ट ज्या मसाई पठारावर दिवसा गेलो तरी, वाट चुकण्याच्या शक्यता अधिक आहेत.अशा प्रसंगी सह्याद्रीच्या दरीतून चढून येऊन हा चित्रपटाचा सेट पेटवला जातो, तेंव्हा आपल्या पोलीस खात्यासाठी हि बाब नामुष्कीची आहे. इतर वेळी आपला धाकदपटशा दाखवणारा पोलीस वर्ग इथं कुठे कमी पडला. हि बाब संशोधनाची आहे.
कोल्हापूर हि चित्रनगरी आहे. इथं विस्तीर्ण निसर्ग संपत्ती आहे.मसाई पठार हे सह्याद्रीच्या टोकावरचा पृष्ठभाग आहे. इथं जाताना नेहमीचा माणूस सुद्धा वाट चुकतो परंतु अज्ञातांनी मात्र आपलं लक्ष्य अचूक टिपलं.
“राणी पद्मावती” आणि त्यांचं घराणं राजपूत समाजाच्या श्रद्धेचं स्थान आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे,हा चित्रपट बनविण्यासाठी आपलं सर्व कौशल्य पणाला लावत आहेत. परंतु आपण जे काही करू, त्याचा समाजावर विपरीत परिणाम होऊ नये, याची खबरदारी भन्साळी यांनी घेणे गरजेचे आहे. “राणी पद्मावती” यांच्या जीवनातील आक्षेपार्ह प्रसंग दाखविण्यासाठी भन्साळी अधीर का आहेत. राजपूत समाजाला ज्या प्रसंगावर आक्षेप आहे,असे प्रसंग काढून टाकल्यास त्यांच्यावर कोणता बाका प्रसंग येणार आहे, कि केवळ पैसे कमवण्याच्या धुंदीत जनमानसांच्या भावनांशी, पैशाच्या मस्तीत खेळणे, हा त्यांचा शौक आहे. ह्या चित्रपटाला राजस्थान मध्ये सुद्धा विरोध झाला असताना, तो कोल्हापुरात आणून पूर्ण करण्याचा त्यांचा हा खटाटोप कशासाठी ?, हे जर त्यांनी स्पष्ट केले तर बरे होईल.”राणी पद्मावती “यांच्या जीवनावरील ते आक्षेपार्ह प्रसंग योग्य आहेत कि अयोग्य ,हा इतिहासाच्या अभ्यासकांसाठी प्रश्न पडला आहे.
सदरची घटना चुकीची असली तरी, इतिहासावर आक्रमण करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरत आहे.अशीच सर्व सामन्यांमध्ये चर्चा आहे.