कर्जमाफीसाठी आम.सत्यजित पाटील यांचा विधानसभेत हल्लाबोल
बांबवडे (प्रतिनिधी) :शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मागणी साठी शिवसेनेचे आमदार विधानसभेच्या अध्यक्षांच्या वेल मध्ये घुसले. यामध्ये शाहुवाडी तालुक्याचे आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनीसुद्धा सहभाग घेतला.
उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या सर्व आमदारांना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत अधिवेशन सोडू नका,असे आदेश दिले होते. त्याचेच पालन करताना, सेनेचे आमदार विधानभवनात आक्रमक झालेले दिसत आहेत. यामध्ये शाहुवाडीच्या आमदारांचा सहभाग म्हणजे, शेतकऱ्यांची तळी कोणी एकटीच संघटना उचलत नसून, शाहुवाडीच्या आमदारांचाही त्यात सहभाग आहे,हे दर्शवते.