मा.एस.बी.पाटील यांच्या यशात आणखी एक मानाचा तुरा
पुणे : शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर चे सुपुत्र , हुतात्मा राजगुरू महाविद्यालायचे प्राचार्य श्री.डॉ.एस.बी.पाटील यांच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. प्राचार्य श्री.डॉ.एस.बी.पाटील यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जनरल झूलाॅॅॅजी हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. हे पुस्तक BSc , MSc च्या विद्यार्थ्यांना उपयोगाचे आहे. हे पुस्तक सक्सेस प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे. या प्रकाशनाच्या वेळी महाविद्यालयातील सर्व मान्यवर उपस्थित होते.