educational

इंटरॅक्टिव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ प्रोजेक्ट चे अनावरण

शिराळा प्रतिनिधी :
ढाणकेवाडी( ता.शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रविण डाकरे यांनी इयत्ता पहिली व अप्रगत मुलांसाठी बनविलेल्या ४५ इंटरॅक्टिव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ प्रोजेक्ट चे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
डाकरे यांनी बनविलेले हे व्हिडिओ प्रत्येक मुळाक्षरांचे असून अक्षरांबरोबर शब्द व वाक्य ओळख यातुन होते. यासाठी त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा क्रोमा इफेक्ट द्वारे व्हिडिओत सहभाग घेतला असून व्हिडिओ प्ले केल्यावर दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी कृती करतात.
हे सर्व व्हिडिओ youtube.com/c/Gurumauli या युट्यूब चॅनलवर अपलोड होणार असून शिक्षकांना सुलभरित्या उपलब्ध व्हावे म्हणून या प्रोजेक्ट चे Easy 2 Learn या नावाचे अॅप बनविलेले आहे. प्रस्तुत अॅप pravindakare.in वरुन डाऊनलोड करून नवनवीन अपडेट्स पाहता येतील.
त्यांना गटशिक्षणाधिकारी सुनिल मंद्रुपकर,विस्ताराधिकारी बाजीराव देशमुख,केंद्रप्रमुख , हरिभाऊ घोडे, तज्ञ मार्गदर्शक भुषण कुलकर्णी, जयदिप डाकरे व मुख्याध्यापक अरुण पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
या उद्घाटन प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, शिक्षण सभापती रवी पाटील,प्राथ.शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे,माध्य. शिक्षणाधिकारी महेश चोथे,.प्राचार्य डॉ. विकास सलगर, प्राथ. उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे, डाॅ. सुरेश माने,जि. प. सदस्या सौ. रेश्मा साळुंखे उपस्थिती होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!