सामाजिक

विशाळगड पाणी योजनेसाठी ५ कोटी देणार- नाम. सदाभाऊ खोत

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील ऐतिहासिक ठिकाण असलेल्या विशाळगड च्या पाणी पुरवठा योजनेसाठी पाच कोटी देणार असल्याची घोषणा राज्याचे कृषी व पाणीपुरवठा मंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी सरूड येथील ‘ शासन आपल्या दारी ‘ या कार्यक्रमप्रसंगी बोलताना केली.
सरूड तालुका शाहुवाडी इथ आज दि.२फेब्रुवारी रोजी येथील निनैदेवी मंदिरात ‘ शासन आपल्या दारी ‘ हा उपक्रम संपन्न झाला. या प्रसंगी कृषी व पाणी पुरवठा राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी जनतेच्या अनेक प्रश्नांवर जनतेने आवाज उठविला. नागरिकांच्या प्रश्नांना त्याचठिकाणी अधिकाऱ्यांमार्फत उत्तर देण्यात आले. याप्रसंगी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, प्रांताधिकारी अजित पवार, तहसीलदार चंद्रशेखर सानप उपस्थित होते.
दरम्यान यावेळी वीज वितरण कंपनी च्या भोंगळ कारभारावर जनतेने आवाज उठविला. जनतेच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची त्रेधातीरपीठ उडाली. तसेच वीज वितरण कंपनीच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. वीज कनेक्शन देताना मीटर देणे हि कंपनी ची जबाबदारी असतानाही, ते मीटर नागरिकांनी स्वतः विकत घेण्याच्या कारभारावर मंत्री महोदयांनी नाराजी व्यक्त केली. तसेच वीज कंपनी ने थकीत बिलावरील व्याज व दंड व्याज न घेता, बिलाची मुळ रक्कम घ्यावी, अशा सूचनाही मंत्री महोदयांनी केल्या. तसेच कृषी विभागानेही आपल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात,असेही सांगितले.
यावेळी बोलताना आमदार सत्यजित पाटील सरुडकर म्हणाले कि,राज्याचे कृषिमंत्री हे थेट जनतेत मिसळणारे असल्याने त्यांनी गावाच्या हद्दीतील मंदिरात कार्यक्रम घेवून शासन पातळीवर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. ते पुढे म्हणाले कि, काही गावची पाणीपट्टी तसेच पाणी बिले थकीत राहिली आहेत. त्याची थकबाकी पुढे चालत आल्याने नवीन मंडळींना काम करण्यास अडचण होत आहे. अशा थकीत ग्रामपंचायतीची बिले माफ करण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी, असे आवाहन हि आमदार सत्यजित पाटील यांनी केले.
यावेळी सभापती सौ,स्नेह जाधव, उपसभापती दिलीप पाटील ,माजी उप सभापती नामदेवराव पाटील सावेकर ,विजय बोरगे जी.प.सदस्य, अमरसिंह हंबीरराव पाटील , पंचायत समिती सदस्य सौ.संगीता पारळे , सौ.अश्विनी पाटील, जालिंदर पाटील, सुरेश पारळे, सुरेशदादा पाटील, पंडितराव शेळके, गटविकास अधिकारी उदय पाटील, ए.पी.पजई विस्तार अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे रमेश घोलप, आदी खातेप्रमुख यांच्यासह ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!