शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागात ‘ सद्भावना रॅली ‘ संपन्न
शित्तूर-वारुण : शाहुवाडी तालुक्यातील उत्तर भागात तरुण मंडळे आणि युवा, ग्रामस्थ यांच्यावतीने सद्भावना रॅली काढण्यात आली. यावेळी जय शिवराय, जय भीमराय च्या घोषणा देण्यात आल्या.
उखळू ते विरळे असा ‘ सद्भावना रॅली ‘ चा मार्ग होता. हि रॅली मोटारसायकल ची होती. या रॅली स उत्तम प्रतिसाद मिळला.
भीमा-कोरेगाव दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर समाज एक व्हावा. समाजात एकतेचा संदेश पोहचावा, हा या सद्भावना रॅली मागील उदात्त हेतू होता.
यावेळी अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष डी.आर. जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी कानसा-वारणा फौंडेशन चे अध्यक्ष कृष्णा पाटील म्हणाले कि, शाहुवाडी तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची जोपासना करणाऱ्या शाहुवाडी तालुक्यात कधीही जातीय दंगली होणार नाहीत.
उखळू, शित्तूर-वारुण, सोंडोली, थावडे, शिराळे-वारुण, खेडे, विरळे येथे रॅली चे उत्साहात स्वागत करण्यात आले. विरळे येथे जाहीर सभा घेण्यात आली.
यावेळी के.जी.पाटील, टायगर ग्रुप चे शिराळा तालुका अध्यक्ष सचिन चौगुले, राजाराम मुटल , विलास बाळतुगडे, मारुती कांबळे, ईश्वरा पाटील, आनंदराव कांबळे, अंकुश कांबळे, महेंद्र पाटील, दशरथ वडाम, किरण पाटील, धीरज लोकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.