सरुडकर दादांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७ फेब्रुवारी रोजी भव्य कुस्त्यांचे मैदान
मलकापूर प्रतिनिधी :
माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्या निमित्त शाहुवाडी, पन्हाळा तालुक्यातील बाबासाहेब पाटील प्रेमी जनतेच्या वतीने अवल्ल दर्जाच्या नामांकित मल्लांच्या निकाली कुस्त्याचे जंगी मैदान बुधवार सात फेब्रुवारी 2018 रोजी लाखो रूपये इनामाच्या कुस्त्यानी संपन्न होणार आहे. हे मैदान शिवाजी स्टेडीयम मलकापूर येथे आयोजित केले असल्याची माहीती, कुस्ती संयोजन समिती अध्यक्ष बाजीराव कळंत्रे , सल्लागार विजय कारंडे यांनी दिली .
शाहुवाडी पंचायत समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेस सभापती डॉ.स्नेहा जाधव , उपसभापती दिलीप पाटील, माजी उपसभापती नामदेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना बाजीराव कळंत्रे म्हणाले कि, माजी आमदार बाबासाहेब पाटील (सरूडकर) यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून लाल मातीमधील कुस्ति ला चालना देण्यासाठी एक भव्य दिव्य आणि देशभरातील नामांकित मल्लांच्या तुल्यबळ निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविले जाणार आहे. शहर व ग्रामीण तालीम संघाच्या मान्यतेने हे मैदान बुधवार ७ फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी तीन वाजता विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी तीन वाजता मैदानाला प्रारंभ होणार आहे.
शिवाजी स्टेडीयम मलकापूर येथे अद्यावत कुस्ती आखाडा तयार करून त्याच बरोबर कुस्ती शौकीनाना सर्व कुस्त्या चांगल्या रितीने पहाता येण्यासाठी गॅलरी व्यवस्थाही स्टेडीयमवर केली जाणार असल्याची माहीतीही, बाजीराव कळंत्रे यांनी दिली.
हे कुस्ती मैदान माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर प्रेम करणारे तमाम जनतेच्यावतीन कुस्ती मैदान संपन्न होणार असून, देशाच्या विविध राज्यातील अनेक नामांकित मल्लांच्या तुल्यबळ लढती या ठिकाणी होणार असून, शाहुवाडी तालुक्यातील कुस्ती शौकिनांसाठी ही एक विशेष परवणी ठरणार आहे. लाखो रूपयाच्या इनामाच्या कुस्त्या या मैदानात होणार आहेत .
या कुस्ती मैदानात ऑलिम्पिक वीर, हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी यांच्यासह नामाकिंत मल्ल , वस्ताद यांची उपस्थिति लाभणार आहे .
शाहुवाडी तालुक्यात प्रथमच अशा अवल्ल दर्जाच्या नामाकिंत मल्लाच्या निकाली कुस्त्याच्या जंगी मैदानाचा कुस्ती शौकीनानी लाभ घेण्याचे आव्हान ही कुस्ती संयोजन समिती अध्यक्ष बाजीराव कळंत्रे ,सल्लागार विजय कारंडे यांनी केले आहे .
या पत्रकार परिषदेस विश्वासचे संचालक दत्ता राणे,अमर पाटील ,संजय गांधी निराधर योजनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील (मानकर), प्रकाश पाटील ,माजी नगरसेवक सुधाकर पाटील ,नगरसेवक प्रल्हाद पळसे, आनंदराव बेंडसे ,अभिजित चौगुले ,शहर प्रमुख बाबू सोनावळे,के जी मोरे ,तानाजी चौगुले,कडवेचे सरपंच संजय लाळे ,बाजीराव गायकवाड,संदीप पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते .सर्जेराव पाटील (मानकर )यांनी आभार मानले .