१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आबू सालेम, डोसा दोषी : विशेष टाडा न्यायालय
मुंबई : १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने गँगस्टर आबू सालेम आणि मुस्तफा डोसा सह सहा जणांना दोषी ठरवलं आहे. बॉम्बस्फोटासाठी गुजरातला आलेला शस्त्रसाठा आबू सालेमने मुंबईला पाठवला होता.तर डोसाने स्फोटासाठी लागणारे आरडीएक्स आणले होते.
हे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी तब्बल तीन हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणण्यात आलं होतं . १२ मार्च १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २५७ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर ७१३ जण जखमी झाले होते. हे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी तब्बल तीन हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणण्यात आलं होतं. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानुसार त्याला फासावर लटकवण्यातही आलंय. या खटल्यातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांच्यासह २७ आरोपी अजूनही फरार आहेत.