‘ लाल दिव्याचा प्रकाश तालुक्यात पडलाच नाही ‘-आमदार सत्यजित पाटील सरुडकर
बांबवडे : ज्या पक्षाचा एक आमदार निवडून आलेला नाही,अशा पक्षाचे नाव घटक पक्ष म्हणून घेतले जाते, हे दुर्दैव आहे. या मंडळींना ज्यावेळी मंत्रीपदाचा लाल दिवा मिळाला होता, त्या दिव्याचा प्रकाश तालुक्यात कधीच पडला नाही, अशी मंडळी मतदारसंघाचा विकास काय करणार ? असे प्रश्न विचारून आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी नाव न घेता माजी मंत्री विनय कोरे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
ते पुढे म्हणाले कि, असे कच्चे लिंबू जर प्रशासनात घटक म्हणून काम करणार असतील तर विकासकामे कशी होणार ? आमदारांनी प्रत्येक कामांचा पाठपुरावा केल्याशिवाय विकासकामे होत नाहीत. परंतु या मंडळीना त्यांच्यावेळी संधी मिळूनसुद्धा साधे जिल्हा नियोजन मंडळाच्या मिटिंग ला उपस्थित राहता आले नाही, ती मंडळी मतदारसंघाचा विकास काय करणार ? यांच्याच काळात इकोसेन्सिटीव्ह झोन जाहीर झाला होता, त्यामुळे येथील ४९ गावात प्रगती झाली नाही. कोडोली स्थानकासाठी २ कोटी रुपये निधी आणला गेला.हा विकास आहे. दरम्यान पैशाशिवाय निवडणूक लढता येत नाही, हे वातावरण आम्ही बदलण्याचा यशस्वी प्रयत्न करणार आहोत.
२००४ साली खांद्यावर घेतलेला शिवसेनेचा भगवा जोवर राजकारणात आहे,तोवर खाली ठेवणार नाही, असेही आमदार सत्यजित पाटील यांनी सांगितले.