कोडोलीत शिवसैनिकांनी केला ५१ वा वर्धापनदिन साजरा
कोडोली प्रतिनिधी:-
शिवसेना पक्षाची स्थापना होऊन आज ५१ वर्षे पूर्ण झाली. मराठी माणसाचा हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून शिवसेनेची ओळख आहे.अशा या शिवसेनेचा आज ५१ वा वर्धापन दिन कोडोली ता.पन्हाळा मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
छत्रपती चौकामध्ये छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्प हार घालून, तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेचे पूजन मंगेश दिवाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेना विभाग प्रमुख अजित पाटील, कोडोली शहर अध्यक्ष मोहन पाटील, संतोष जाधव आणि शिवसैनिक उपस्थित होते.