कोल्हापुरातील छ.शिवाजी पुलाचा पर्यायी पूल होणार कधी ?
बांबवडे : कोल्हापूर येथील शिवजी पुलाला पर्यायी पूल म्हणून निर्माण केलेला पूल अर्धवटच राहिला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा नाकर्तेपणाच आहे.
कोल्हापूर येथील शिवाजी पुलाला पर्यायी पूल निर्माण करण्याचा निर्णय घेतला गेला. परंतु हा पूल पूर्ण होण्यासाठी येथील पाण्याचा हौद आडवा येत असून, गेली दीड वर्ष हा हौद हटवण्याचं काम बांधकाम विभागाला अद्याप जमलं नाही. दरम्यान सावित्री पुलाच्या दुर्घटने वेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सहा महिन्यात पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही या नवीन पुलाचे बांधकाम अर्धवटच राहिले असून, दुसरा पावसाळा तोंडासमोर येवूनही हे काम अपूर्णच आहे.
कोल्हापूर येथील शिवाजी पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली असून, या पुलाची क्षमता संपली असल्याने, पर्यायी पुलाचा निर्णय घेणात आला होता.परंतु आजही हा पूल अर्धवटच आहे. सावित्री पुलासारखी दुर्घटना घडण्याची शासन वाट पाहत आहे का? असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जात आहे.