संप सुरूच ठेवण्याचा कोअर कमिटीचा निर्णय
नाशिक : नाशिक मध्ये किसान क्रांती संघटनेने संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दि.२जुन रोजी मुख्यमंत्र्यांशी मध्यरात्री झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर शेतकरी संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु हा निर्णय पुणतांबे येथील शेतकऱ्यांना मान्य नसून ,शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे, या निर्णयावर येथील शेतकरी ठाम आहे. याबाबत शेतकरी कोअर कमिटी ची आज दि.३जुन रोजी सकाळी बैठक झाली. या बैठकीत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.