“दत्तसेवा विद्यालय” तुरूकवाडी ची गरूड भरारी १००% निकाल
बांबवडे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने माहे फेब्रुवारी २०१७ मध्ये घेतलेल्या परिक्षेत दत्तसेवा विद्यालय, तुरूकवाडीचा निकाल १००% लागला विद्यालयातून कु. शिला बजरंग ढेकळे हिने ६७% गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. अर्चना बाळासो पाटील हिने ६४% गुण मिळवून द्वितीय क्रमांक व कु. शंकर महादेव पाटील तसेच कु. प्रविण जयसिंग पाटील यांनी ६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
ग्रामीण भागातील मुलांना सर्व सोयींनीयुक्त शिक्षण मिळावे, याकरिता दत्तसेवा विद्यालय सुरू करण्यात आले असून, संस्थेच्या प्रगती करिता संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष मा. श्री. आनंदराव माईंगडे व उपाध्यक्ष अॅड. सतिश आनंदराव माईंगडे यांचे मार्गदर्शन लाभत असते. तसेच माध्यमिक विभाग मुख्याद्यापक व शिक्षक वर्गाने घेतलेल्या मेहनतीमूळे सदर यश मिळाले आहे, असे मत संस्थापक-अध्यक्ष श्री. आनंदराव माईंगडे यांनी व्यक्त केले.
विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थी ही शेतकऱ्यांची मुले असल्याने व आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, कोणीही शिकवणीला जात नव्हते. फक्त शिक्षकांनी जादा तास घेवुन, कोणताही मोबदला न घेता शिक्षक म्हणून प्रयत्न केला आहे. त्या सर्व विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे सर्व तुरूकवाडी ग्रामस्थ व दत्तसेवा परिवारांतील सदस्यांनी हार्दिक अभिनंदन केले.