महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार- उद्धव ठाकरे
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार, असा उद्घोष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
१९ जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांसमोर उद्धव ठाकरे बोलत होते. आपल्या भाषणात श्री ठाकरे पुढे म्हणाले कि, यावेळी जे आव्हान घेवून समोर येतील, ते मोडून काढू, असा आक्रमक पवित्रा घेत, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा लक्ष्य केले.
यावेळी शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले कि, इथून मागे देशात मुघलांचा हिरवा वरवंटा येत होता, त्याला हिंदुत्वाच्या भगव्या झेंड्याखाली चिरडून टाकला. पण इथे मराठी माणसातच पगडी च्या आडून फुट पडण्याचा प्रयत्न होत आहे. अशांना मराठी जनता घालवल्याशिवाय रहाणार नाही. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज हि आमची दैवत आहेत. असेही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले.