…आणि पालकमंत्री चिडतात तेंव्हा
बांबवडे : शेतकऱ्यांच्या हिताच्या स्वामिनाथन आयोगाचे काय झाले, शेतकऱ्यांसाठी २४ तास वीज पुरवणार,त्याचे काय झाले ? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली असता, त्यांना अटक करण्यात आली. पालकमंत्री नामदार पाटील संतापले, व मी सांगेल त्यांनीच बोलायचे, असे सांगितले .
साळशी तालुका शाहुवाडी इथं ‘ शिवार संवाद यात्रे ‘ दरम्यान शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्यास नाम .पाटील यांनी च सांगितले. परंतु प्रश्न अडचणीत आणणारे असल्याने ते संतापले.
या दरम्यान सुरेश म्हाउटकर यांनी मंत्र्यांना थेट अडचणीत आणणारे प्रश्न विचारले. शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न आजही तसाच आहे. निवडणूक काळात मोदीजींनी शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोग लागू करू, असे सांगितले होते, परंतु त्याबाबत अद्याप काहीही झालेले नाही. यामुळे मंत्री महोदय चिडले. व या स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. व नंतर सोडण्यात आले.
Absolutely spot on — superb advice http://hometheaterinfoline.com/19-2/
Thanks