गुन्हे विश्वसामाजिक

सोनवडे पैकी शिंदेवाडी येथील दोन दुचाकींच्या अपघातात चौघेजण जखमी

बांबवडे : सोनवडे पैकी शिंदेवाडी तालुका शाहुवाडी परिसरात दोन दुचाकींचा अपघात होवून, दोन्ही दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मागे बसलेली मुलगी व त्यांची भाची देखील जखमी झाल्या आहेत. या सर्वांना कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी सोनवडे पैकी शिंदेवाडी दरम्यान बांबवडे हून शित्तूर तर्फ मलकापूर येथील श्रीकांत बाबुराव कांबळे, ऋतुजा संजय कांबळे हे व त्यांची लहान भाची यांना घेवून शित्तूर तर्फ मलकापूर ला ( दुचाकी क्रमांक MH-10-BD- 7924 )वरून निघाले होते. दरम्यान सोनवडे हून बांबवडे कडे विनोद बळवंत पाटील (दुचाकी क्रमांक MH-09-EF- 2187 )आपल्या दुचाकीवरून बांबवडे कडे निघाले होते. या दोन्ही दुचाकींची धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात चौघेजण जखमी झाले आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!