कासेगाव च्या संघाने ” तात्याप्रेमी चषक ” पटकावला
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं कबड्डी चे सामने संपन्न झाले. हे सामने ‘ महेश निकम तात्या प्रेमी ग्रुप ‘ च्या वतीने भरवण्यात आले होते.
या कबड्डी सामन्यांमध्ये कासेगाव च्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत ” तात्याप्रेमी चषक ” पटकावला. तळसंदे च्या संघाने द्वितीय, तर ठमकेवाडी तालुका शाहुवाडी येथील संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
यावेळी इतर बक्षिसे देखील ठेवण्यात आली होती. यामध्ये उत्कृष्ठ खेळाडू हा किताब सागर पाटील सागाव, तालुका शिराळा, बेस्ट डिफेंडर -तानाजी जाधव (कासेगाव), बेस्ट रायडर संतोष शिंदे (मांडवकरवाडी )यांनी देखील बक्षिसे मिळवलीत.
यावेळी ‘ महेश निकम तात्या प्रेमी ग्रुप ‘ चे दादासो जाधव, अविनाश गावडे, किरण गावडे, सुरज बंडगर, पंकज निकम, अमर निकम, महादेव निकम, अभिजित निकम, विकी मूडशिंगकर, शशी ठमके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.