उदय साखर च्या आठ जागांसाठी आज मतदान
बांबवडे : उदय सह.साखर कारखाना बांबवडे-सोनवडे तालुका शाहुवाडी,या साखर कारखान्याच्या उर्वरित आठ जागांसाठी आज मतदान होत आहे.
बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय तसेच प्राथमिक विद्यामंदिर इथं ,या दोन्ही केंद्रावर आज सकाळी ८.०० ते ४.०० वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. दरम्यान उदय साखर च्या ११ जागा अगोदरच बिनविरोध झाल्या असून, उर्वरित आठ जागांसाठी हे मतदान होणार आहे. कारखान्याचे संस्थापक मानसिंगराव गायकवाड यांनी ११ जागा बिनविरोध करून कारखाना आपल्याकडे ठेवण्याचे अग्निदिव्य या अगोदरच पूर्ण केले असल्याने, या आठ जागांची निवडणूक हि केवळ औपचारिकता राहिली आहे.