मोसम इथं नदीत बुडून एकाचा मृत्यू
मलकापूर प्रतिनिधी :
मोसम तालुका शाहुवाडी येथे कासारी नदीत आंघोळीला गेलेल्या अझर अमर काझी (वय30 )रा. कात्रज पुणे या मिनी बसचालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद शाहुवाडी पोलिसात झाली आहे.
पोलीसांकडुन मिळालेल्या माहिती नुसार, शुक्रवार 28 एप्रिल रोजी अमर काझी हे पुण्याहुन मिनी बस घेऊन मोसम येथील यशवंत कुलकर्णी यांच्या फार्म हाऊसवर आले होते. दरम्यान ते कासारी नदीच्या पाण्यात आंघोळीला गेले असता, त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद शाहुवाडी पोलीसात झाली.
मलकापूर ग्रामीण रूग्णांलयात श्ववविछ्चेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.