‘माळीण ‘ ला धोका नाही -दिलीप वळसे-पाटील
पुणे : नवीन माळीण मधील घरे आधुनिक तंत्रज्ञानाने बनवण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना कोणताही धोका नसल्याची माहिती आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.
माळीण मध्ये जवळपास शंभर मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे काहीठिकाणी नवीन भाराव टाकून तयार करण्यात आलेल्या जमिनीची माती खचल्याचे समोर येत आहे. मात्र, गावाला कुठेही धोका नाही. असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान माळीण गाव दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात येते.