Recentगुन्हे विश्व

वारणा नदीत नवविवाहित युवकाचा बुडून मृत्यू

कोडोली प्रतिनिधी : चिकूर्डे पुलाजवळील वारणा नदी पात्रात नवविवाहित तरुण बुडाला आहे . आज सोमवार दिनांक १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कोडोली ता.पन्हाळा येथील शाहू कॉलनी येथे राहणार सिध्दिक राजू मुल्ला वय वर्ष २२ हा नवविवाहित तरुण वारणा नदी पात्रात पोहण्यास गेला असता बुडाला.जीवन ज्योत कडून तरुणाचा शोध सुरू आहे.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार सिध्दिक राजू मुल्ला याचा विवाह काल रविवार दिनांक १८ मार्च रोजी तासगाव येथे झाला आहे.मंगळवार दिनांक २० मार्च रोजी विवाहाचे स्नेहभोजन घरी असल्याने आज दुपारी सिध्दिक याचे कुटूंब चिकूर्डे येथील नदी पात्रात कपडे धोण्यासाठी गेले होते व सिध्दिक यास घरी थांबण्यास सांगितले होते.
सिध्दिक याने घरी कोणाला न सांगता तो चिकर्डे येथील वारणा नदीवर गेला.वारणा नदी पात्रात त्याचे घरचे पाहुणे नदी पात्रात पोहण्याचा आनंद घेत होते हे पाहून सिध्दिक नदी पत्रात उतरू लागला. त्याचे पाहुणे त्यास सांगत होते तुला पोहता येत नाही तू पाण्यामध्ये येऊ नको.सिद्धीक याने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पाण्यामध्ये उतरला आणि तो वाहत्या पाण्यामध्ये बुडाला त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला पण वाहते पाणी असल्याने त्यांना अपयश आले.सिध्दिक यास शोधण्यासाठी कोल्हापूर येथून जीवन ज्योत टीम दाखल झाली असून त्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे.सिध्दिक याचा काल विवाह झाला असून या घटनेमुळे लोकांच्या मधून हळहळ व्यक्त केली जात आहे.या घटनेची नोंद अजून हातकणंगले  आणि कोडोली हद्दीमुळे पोलीस ठाण्यात अद्याप झालेली नाही.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!