नागपंचमीच्या गर्दीत चेन स्नॅचींग – दोघांना अटक
शिराळा प्रतिनिधी : येथील नागपंचमी उत्सवाच्या गर्दीचा गैरफायदा घेवून , २५ हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची चेन चोरण्यात आली.याआरोपाबाबत शिराळा पोलिसांनी रोहिदास अंकुश गायकवाड ( वय २८ वर्षे ), व भारत बाबुराव जाधव (वय ६५ वर्षे ),रहाणार सुभाष कॉलनी,बीड यांना अटक करून, न्यायालयात हजरकेले असता, न्यायालयाने या दोघांना तीन दिवसाची ,म्हणजेच ३१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अमोल जयवंत धर्मे रहाणार रेठरे बुद्रुक यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी कि, दि.२७जुलै रोजी नागपंचमी निमित्त शिराळा इथ मिरवणूक निघाली होती. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तळीचा कोपरा इथ अमोल त्यांच्या मित्रांसमवेत मिरवणुकीत होते. त्यावेळी रोहिदास ने अमोल च्या खांद्यावर टॉवेल टाकून गळ्यातील सोन्याची चेन खेचली. त्यावेळी अमोल ने रोहिदास ला पकडले असता, भरत जाधव ने अमोल ला धक्का देवून रोहिदास ला सोडवण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलिसांनी रोहिदास व भरत ला पकडले. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पी.एस.जाधव करीत आहेत.