१०० टक्के नोकरीची हमी देणारे ‘येस टेक्नो, मलकापूर’
मलकापूर : शाहुवाडी तालुक्याला लागलेली बेरोजगारीची वाळवी जर दूर करायची असेल तर विद्यार्थ्याला तांत्रिक प्रशिक्षण देणं हि काळाची गरज ठरत आहे. यासाठीच काळाची पाऊल ओळखून येस टेक्नो मलकापूर येथे तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी कार्यरत झालं आहे.
तालुक्यात पसरलेली बेरोजगारी हटवण्यासाठी केवळ शासन तसेच प्रशासनाला धारेवर धरता येत नाही. तर यासाठी इथल्या तरुणांना तांत्रिक प्रशिक्षण देणं आणि त्या प्रशिक्षणाचा अनुभव युवकांना देणं, हि काळाची गरज आहे. कारण तुमच्याकडे कौशल्य असल्याशिवाय बाहेरील जगात तुमची किंमत होणार नाही. आणि हे कौशल्य आणि त्याच बरोबर त्या कौशल्याचा अनुभव ही सुद्धा तितकीच महत्वाची बाब आहे. म्हणूनच श्री.अमोल गायकवाड यांनी श्री.चंद्रसेन पवार , श्री.चंद्रकांत पवार, श्री.सागर संकपाळ , श्री.निलेश पाटील ,यांच्या सहकार्याने मलकापूर येथे हे तांत्रिक प्रशिक्षण केंद्र सुरु केल आहे. या प्रशिक्षण केंद्रात विविध शाखेचे प्रशिक्षण दिलं जातं . केवळ प्रशिक्षणच दिलं जातं अस नाही तर त्याचबरोबर ९ ते १५ हजारी पगाराची नोकरीसुद्धा देण्याची स्टॅम्प पेपरवर लेखी हमी , ही संस्था देत आहे. यामूळे इथला तरुण वर्ग आपल्या शाखेत कौशल्य प्राप्त करेल आणि अनुभवासाठी त्याला नोकरीसुद्धा मिळेल.
या प्रशिक्षण केंद्रामध्ये क्लासरूम , वर्कशॉप असे विविध विभाग केले आहेत ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी केवळ शिकणारच असे नाही तर त्याचे प्रात्यक्षिक सुद्धा वर्क शॉप मध्ये स्वतःच्या हाताने करू शकेल. तांत्रिक दृष्ट्या प्रशिक्षित झाल्यानंतर युवकांना जिथे नोकरी दिले जाते, त्याठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था सुद्धा संस्थेच्या वतीने करण्यात येते. तसेच युवक जिथे काम करतात तिथे काही समस्या उद्भवल्यास संस्थेच्या वतीने सोडवल्या जातात. एवढी लिखित हमी सध्याच्या नो गॅरंटी च्या जगात कुणीही देत नाही. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी तसेच युवक प्रशिक्षित होऊन चांगल्या प्रकारे अर्थार्जन करण्यास सक्षम करणे हा या संस्थेचा मूळ उद्देश आहे. ज्या माध्यमातून प्रशिक्षित विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील . आणि दारिद्र्य रेषेचा चढता आलेख थांबवण्यासाठी कुठे तरी पायबंद बसेल. येस टेक्नो हि संस्था दुर्गम भागातील युवकांसाठी काम करीत असून इथल्या व्यथा व परीस्थितीची त्यांना जाणीव आहे. यामुळे भरमसाठ फी न आकारता माफक दरात फी आकारून सामान्य जनतेसाठी येस टेक्नो म्हणजे आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. तेव्हा तालुक्यातील तमाम बेरोजगार युवकांना उपलब्ध झालेली हि संधी आहे. त्याचा लाभ घेऊन , तांत्रिक दृष्ट्या प्रशिक्षण घेऊन, दारिद्र्य आणि मागासलेपणाचा कलंक कायमस्वरूपी पुसून टाकू शकतो. म्हणूनच तांत्रिक व कौशल्य शिक्षण घेऊन युवकांनी सक्षम व्हावे असे आवाहन,श्री. अमोल गायकवाड यांनी SPS NEWS शी बोलताना केले.
या संस्थेची माहिती, प्रशिक्षण आणि नोकरीची हमी हि माहिती देण्यासाठी तसेच दहावी बारावी नंतर काय करायचे, या तरुणाईच्या मनामध्ये पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दि.२९ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ९ वाजता येस टेक्नो इन्स्टिट्यूट शाखा मलकापूर, हॉटेल निनाई च्या समोर, मलकापूर एस.टी.स्टॅंड जवळ आपेष्टे बिल्डींग मध्ये फ्री सेमिनार आयोजित करण्यात आला आहे.यासाठी अधिक संपर्क ८३०८५६७१८५,८३०८६६७२८५,८६९८०६२८३७ या दूरध्वनी वर साधावा, असे शाखा समन्वयक सुशांत कांबळे सर, प्राचार्य श्री.नामदेव कांबळे सर यांनी सांगितले आहे..अशा या शाहुवाडीतील युवकांसाठी यशस्वितेचे माहेर घर असणाऱ्या येस टेक्नो याच संस्थेत आपला प्रवेश निश्चित करा आणि आपले भविष्य उज्वल करा…