दत्तसेवा विद्यालय एक दिपस्तंभ
तुरुकवाडी: दत्तसेवा निवासी विद्यालय तुरुकवाडी म्हणजे सह्याद्रीच्या कुशीतील एक ज्ञानाचं संकुल. विद्यालयाचे संस्थापक श्री.आनंदराव माईगडे यांनी ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक ज्ञानज्योत पेटवली आहे. हे कार्य त्यांनी दूर दृष्टी ठेऊन केल असून ग्रामीण भागातील जनतेला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि ते शिक्षण सुद्धा केवळ शिक्षण नसावं तर त्यातून भविष्यासाठी अनेक विविध पर्याय निर्माण झाले पाहिजेत.या अपेक्षेने लावलेला एक कल्पवृक्ष म्हणावयास हरकत नाही.
याला कल्पवृक्ष अशासाठी म्हणायचं कारण इथं शिक्षणासोबत खेळ व्यायाम आणि प्रबोधन,याच बोधामृत पाजल जात आहे. क्रीडा क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक इथल्या विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन करतायेत. भविष्यात या विद्यालयातील विद्यार्थी पोलीस खात्यात जाताना शारीरिक चाचणीमध्ये कमी पडू नयेत म्हणून व्यायामाच्या माध्यमातून इथले विद्यार्थी तयार केले जात आहेत. इथून बाहेर पडलेला विद्यार्थी जर प्रशासकीय सेवेत जन असेल तर त्याचं प्राथमिक ज्ञान गेस्ट लेक्चर च्या माध्यमातून त्यांना दिल जातंय. इथली निवासी व्यवस्था पोषक आहारासाहित उत्तमरीत्या राबविली जाते. इथला शिक्षक वृंद प्रशिक्षित असून त्यांचा विद्यार्थ्यांवर वैयक्तिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून कृपा आशीर्वाद असतो. अनिवासी विद्यार्थ्यांना दिली जाते,बस ची सुविधा.
असे अनेक विध पर्याय या दत्तसेवा संकुलामध्ये उपलब्ध आहेत. तुरुकवाडी सारख्या छोट्याश्या गावात, निसर्गाच्या सानिध्यात नांदत असलेलं दत्तसेवा संकुल विद्यार्थांचा दिपस्तंभ झाल्याशिवाय राहणार नाही.