ग्रामपंचायत च्यावतीने प्रजासत्ताकदिनी देशमुख, श्रावणी निकम यांचा सन्मान संपन्न
बांबवडे : बांबवडे ग्रामपंचायत च्यावतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनादिवशी येथील शेतकरी श्री मारुती गोविंद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून, एक नवा निर्णय बांबवडे ग्रामपंचायत चे लोक्नियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्य मंडळ यांनी घेतला.
याचबरोबर यावेळी येथील तलाठी गगन देशमुख यांनी महसूल विभागात काम करून देखील जलतरण स्पर्धेत सुवर्णपदके प्राप्त केलीत. यास्तव त्यांचा सत्कार नंदू शेठ फाटक यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच येथील श्रावणी अरुण निकम हिंची गोळाफेक स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
यावेळी लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले, उपसरपंच दीपक निकम, माजी उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील, ज्येष्ठ सदस्य सुरेश नारकर, विद्यानंद यादव, दिग्विजय पाटील, सौ मनीषा पाटील, सौ शोभा निकम, सौ सीमा निकम,सौ. कविता प्सौरभावळे,. वंदना बंडगर, सौ सुनिता कांबळे यांच्यासहित श्री महादेव ग्रामविकास आघाडी,तसेच पदाधिकारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.