ग्रामपंचायत बांबवडे च्या वतीने मुकुंद पवार यांचे अभिनंदन
बांबवडे : ग्रामपंचायत बांबवडे तालुका शाहुवाडी च्या वतीने श्री मुकुंद पवार यांना आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल, त्यांचे ग्रामपंचायत कार्यालयात फेटा, शाल, व पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करीत, त्यांचा सत्कार केला.


हा सत्कार लोकनियुक्त सरपंच श्री भगतसिंग चौगुले व उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ सदस्य श्री सुरेश नारकर, ग्रामसेवक आर.बी.कुरणे, दीपक निकम, दीपक पाटील, प्रकाश पाटील, मनीषा पाटील, सुनिता कांबळे, कविता प्रभावळे, दिग्विजय पाटील, संजय पाटील, विद्यानंद यादव, सौ.शोभा निकम. सौ. सीमा निकम. सौ.वंदना बंडगर महादेव कांबळे शिपाई आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना मुकुंद पवार म्हणाले कि, बांबवडे ग्रामपंचायत ने केलेला सत्कार म्हणजे केलेल्या कर्तुत्वाला मातीचा सुगंध प्राप्त झाल्यासारखा आहे. म्हणूनच हा सत्कार मी विसरू शकत नाही. आणि आपल्या ऋणात राहू इच्छितो.

तसेच ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, व सर्व सदस्य,ग्रामसेवक व ग्रामस्थांचे आभार देखील श्री मुकुंद पवार यांनी मानले.