तालुक्यात ७४ व प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यात ७४ व प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सर्व प्रशासकीय कार्यालये, निमसरकारी संस्था, शाळा, महाविद्यालये इथं प्रजासत्ताक दिन संपन्न झाला. शाळा, महाविद्यालयामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.

विद्यार्थ्यांच्या कवायती, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. विविध ठिकाणी संविधान प्रतीकेचे वाचन करण्यात आले. यामुळे सामाजिक समतेचे दर्शन जनतेला पहायला मिळाले.
शाहुवाडी तहसीलदार कार्यालय प्रांगणातील ध्वजारोहण तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अप्पर तहसीलदार निखील खेमनार , नायब तहसीलदार रवींद्र मोरे, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, गटविकास अधिकारी रामदास बघे, माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी, तसेच तालुक्यातील विविध स्तरातील लोकप्रतिनिधी सुधा यावेळी उपस्थित होते.